अहमदाबाद : मुस्लिम पुरूष कुराणचा गैरवापर करत असल्याचं मत गुजरात हायकोर्टानं नोंदवलंय. त्यासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज हायकोर्टानं व्यक्त केलीय.
गुजरातमधल्या जफर अब्बास यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनं कलम ४९४ अंतर्गंत तक्रार दाखल केली होती. पत्नीच्या संमतीशिवाय जफर दुसरं लग्न करत असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीन दाखल केली होती.
जफर यांनी बचावासाठी 'मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा'चा दाखला दिला होता. मुस्लिम पुरूष एकापेक्षा जास्त लग्न करू शकतो असं यात म्हटलंय.
या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्या. जे बी परदीवाला यांनी जफर यांच्या बाजुनं कौल दिला असला तरी काही महत्त्वाचे मुद्देही मांडलेत.
जास्त लग्नांची मान्यता कुराणात दिली त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. मात्र आता स्वार्थापायी अनेक लग्नं केले जात असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.