नवी दिल्ली : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोमवारी टोमणा मारलाय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या मुद्द्यावरून लोकसभेतील चर्चेत सहभागी होताना, केंद्र सरकारमध्ये केवळ नितीन गडकरीच खरे बोलतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
लोकसभेमध्ये नियम १९३ अंतर्गत झालेल्या चर्चेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सरकारमध्ये केवळ नितीन गडकरीच खरे बोलतात. त्यांनी शेतकऱयांना उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते की, शेतकऱयांनी देव किंवा सरकार यापैकी कोणावरही विश्वास ठेवायला नको.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावेळी नितीन गडकरी सभागृहामध्ये उपस्थित नव्हते. शेतकऱयांना असे सांगून त्यांनी सरकारची शेतकऱयांबद्दल असलेली भूमिकाच स्पष्ट केली असल्याची टीका त्यांनी केली. नितीन गडकरी यांनी या वक्तव्यातून आपली मन की बात मांडल्याचे राहुल गांधी म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.