www.24taas.com, नवी दिल्ली
भाजपच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंह यांची बिनविरोध निवड करण्यात आलीय. बुधवारी दुपारी १२ वाजता या निर्णयाची औपचारिक रित्या घोषणा करण्यात आलीय. अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्यानं राजनाथ सिंह यांची बिनविरोध निवड झालीय. ते दुसऱ्यांदा भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान झालेत.
दरम्यान, या औपचारिक घोषणेच्या अगोदरच भाजपच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंह विराजमान होणार हे निश्चित झालं होतं. भाजपच्या संसदीय दलाची बैठक झाली, या बैठकीत राजनाथ सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं.
दरम्यान, मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा देत असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. त्यानंतर गडकरींच्या जागेवर राजनाथ सिंह यांची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झालीय.