बलात्काराचा आरोप असणाऱ्या कैद्यावर गहमंत्र्यांची स्तुतीसुमनं...

गृहमंत्री राजनाथ सिंह आणि विश्व परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल सध्या वादात अडकलेत. १६ वर्षांच्या तरुणीवर बलात्काराच्या प्रकरणात सध्या तुरुंगात बंद असलेल्या आसारामवर कौतुकाचा वर्षाव केल्यानं सिंह आणि सिंघल यांच्यावर अनेकांनी टीका केलीय. 

Updated: Feb 24, 2015, 09:57 PM IST
बलात्काराचा आरोप असणाऱ्या कैद्यावर गहमंत्र्यांची स्तुतीसुमनं... title=

नवी दिल्ली : गृहमंत्री राजनाथ सिंह आणि विश्व परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल सध्या वादात अडकलेत. १६ वर्षांच्या तरुणीवर बलात्काराच्या प्रकरणात सध्या तुरुंगात बंद असलेल्या आसारामवर कौतुकाचा वर्षाव केल्यानं सिंह आणि सिंघल यांच्यावर अनेकांनी टीका केलीय. 
 
अहमदाबादहून प्रकाशित होणाऱ्या आसारामच्या संस्थेचं मुखपत्र 'ऋषिप्रसाद'मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांचा एक लेख प्रकाशित झालाय. यामध्ये, मीडिया ट्रायलमुळेच कोर्टावर दबाव पडल्याची मुक्ताफळं जेटलींनी उधळलीत. स्वत:ला संत म्हणवणाऱ्या आसारामच्या या मुखपत्राच्या कव्हर पेजवर राजनाथ, जेटली आणि सिंघल यांच्या फोटोसोबत एक छोटा लेख प्रकाशित करण्यात आलाय. 

कव्हर पेजवर राजनाथ सिंह आणि अरुण जेटली यांना कर्मयोगी म्हटलं गेलंय. सिंघल यांचा हवाल देत '७६ वर्षीय बापूजीला चुकीच्या पद्धतीनं फसवून त्यांच्यावर अत्याचार केला जातोय... त्यांना लवकरात लवकर जामीन मिळावा' असंही यात म्हटलं गेलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.