सिडनी : वर्ल्डकप क्रिकेटमध्ये शिखर धवन शानदार खेळी करतोय, मात्र त्यांच्या यशाचं श्रेय हिसाकवण्याचा प्रयत्न वेस्ट इंडिजचा महान गोलंदाज मायकल होल्डिंगने केला आहे. मायकल होल्डिंग म्हणतात की, डावखुरा फलंदाज शिखर धवन हा भाग्यशाली आहे, कारण त्यांच्या आजूबाजूचे सदस्य समजदार आहेत, ते चांगल्या मेंटरची भूमिका पार पाडतात.
ट्राय सिरिजमध्ये शिखर धवनने खराब प्रदर्शन केल्यानंतर, वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात ७३ धावांची खेळी करून, शिखरला सूर गवसला आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात १३७ धावा ठोकून त्याने पूल बी मध्ये भारताला दुसरा विजय मिळवून दिला.
होल्डिंग म्हणतो, कोच डंकन फ्लेचर, टीम निर्देशक रवी शास्त्री आणि कप्तान महेंद्र सिंह धोनी सारख्या लोकांनी, नेहमी धवन सारख्या प्रतिभाशाली खेळाडूंना मोठं होण्यास साठी साथ दिली आहे.
कोच डंकन फ्लेचर, रवी शास्त्री, महेंद्रसिंह धोनी हे क्रिकेटचे जाणकार लोक आहेत, ते घाबरून जात नाहीत, ते क्रिकेटला ओळखतात, क्रिकेटरची क्षमता ते ओळखतात, ते योग्य त्या खेळाडूंना संधी देऊन, त्यांचा आत्मविश्वास वाढवतात.
होल्डींग म्हणाले ईमानदारीत सांगू, मागील सहा-सात वर्षात, टीम इंडिया मागील १५ वर्षांच्या तुलनेने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतेय, आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगली फिल्डिंग सहसा कुणाचीही होत नाही, मात्र टीम इंडिया क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेला टक्कर देतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.