www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा देशातील विविध बॉम्बस्फोटांना `आशिर्वाद` होता, असा खळबळजनक दावा या स्फोटांतील आरोपी स्वामी असीमानंद यांनी केलाय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हे आरोप फेटाळून लावलेत. मात्र यानिमित्तानं सरसंघचालक भागवत विरोधकांच्या टीकेच्या रडारवर आलेत. या प्रकरणाचे पडसाद संसदेत उमटण्याची शक्यता आहे. स्वामी असीमानंद यांच्या स्फोटक वक्तव्यामुळं सध्या एकच खळबळ माजलीय. समझौता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशीद आणि अजमेर बॉम्बस्फोट प्रकरणातील, प्रमुख आरोपी असलेल्या असीमानंद यांनी या स्फोटांचा थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांशी संबंध जोडलाय.
या स्फोटांसाठी सरसंघचालक मोहन भागवत आणि संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी इंद्रेश कुमार यांचा आशिर्वाद होता, असं स्फोटक विधान त्यांनी केलंय. एका इंग्रजी मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.