पणजी : औकातीची भाषा मुख्यमंत्री पदाला शोभत नाही. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या मग दाखवतो औकात असा पलटवार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय.
कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणांनंतर राऊत गोव्यात पत्रकारांशी बोलत होते. ज्या पक्षाचा अध्यक्ष पैसे घेताना पकडला जातो त्यानी आमच्याशी खंडणीवर बोलू नये अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.
आम्हाला 60 जागा देऊन आमची औकात काढणाऱ्यांना निकालाच्या दिवशी औकात दाखवू असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मेळाव्यामध्ये केलं होतं.