नवी दिल्ली : आता, १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना सिगारेट किंवा टोबॅकोचा समावेश असलेले पदार्थ विकणं हा देखील फौजदारी गुन्हा (क्रिमिनल ऑफेन्स) आहे. या गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. शिवाय एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
युवा कायदा (मुलांचे संगोपन व संरक्षण) अधिनियम, २०१५ प्रमाणे अल्पवयीन मुलांना सिगारेट आणि टोबॅको विकणं हा फौजदारी गुन्हा असल्याचं पहिल्यांदाच नमूद करण्यात आलंय.
या अगोदर १८ वर्षांपेक्षा लहान मुलांना दारू आणि अंमली पदार्थ विकणं हा फौजदारी गुन्हा असल्याचं कायद्यात म्हटलं होतं.
शिवाय, सिगारेट आणि टोबॅको प्रोडक्ट कायद्यानुसार एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर अंतरापर्यंत सिगारेट आणि टोबॅको विकणं कायद्यानं गुन्हा आहे.