ढोलताशांच्या गजरात गोव्यातल्या शिमगोत्सवाला सुरुवात

ढोलताशांचा ताल आणि ओस्सायच्या गजरात गोव्यातल्या जगप्रसिद्ध शिमगोत्सवाला शानदार सुरवात झाली.

Updated: Mar 19, 2017, 11:58 PM IST
ढोलताशांच्या गजरात गोव्यातल्या शिमगोत्सवाला सुरुवात

पणजी : ढोलताशांचा ताल आणि ओस्सायच्या गजरात गोव्यातल्या जगप्रसिद्ध शिमगोत्सवाला शानदार सुरवात झाली. लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणा-या या उत्सवात मोठ्या संख्येनं गोवेकरांसह देशविदेशातले पाहुणे सहभागी होतात. हा महोत्सव आठ दिवस चालतो.

अहोरात्र राबणारे शेतकरी सुगी संपवून माडावर जमतात आणि सुरु होतो शिगम्याचा ताल. होळीपासून गोव्यातल्या शिमगोत्सवाला सुरवात होते. वेशीवरच्या ग्रामदेवाला नारळ ठेवून मुख्य मिरवणूक काढली जाते.

यात सुरवातीला रोमठामेळ असतो. यंदा पहिल्यांदाच महिलांची रोमठामेळ पथकं यात सहभागी झाली होती, जी सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती. शिगमोत्सवाच्या मुख्य मिरवणुकीत विविध लोककला आणि लोकनृत्य सादर केली जातात. यात ढोलताशे, समेळ यांचा रोमठामेळ असतो. त्याबरोबरच धालो, फुगडी, घोडेमोडणी, गोफ, वीरभद्र सारख्या लोकपरंपरा आणि नृत्यही सादर केली जातात.

असा असतो गोव्यातला शिमगोत्सव