नवी दिल्ली : उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला दोन मंत्रीपदं हवी आहेत. त्यात एक कॅबिनेट किंवा स्वतंत्रप्रभार आणि एक राज्यमंत्रीपद मिळावं अशी पक्षाची मागणी आहे.
सध्या शिवसेनेकडे एक कॅबिनेट मंत्रीपद आहे. गेल्या विस्ताराच्या वेळी कॅबिनेट मंत्रीपद न देता राज्यमंत्रीपद ऑफर झाल्यानं अनिल देसाई ऐनवेळी दिल्लीला जाऊन परत आले होते. त्यामुळे यंदातरी सेनेची मागणी पूर्ण होणार का याकडे सर्वांचं लक्ष्य आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्याप्रमाणावर वाद सुरु आहेत. त्यामुळे शिवसेनेची ही मागणी पंतप्रधान मान्य करून शिवसेनेचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न करणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.