गोवा छुपा कॅमेरा प्रकरण : चौघांची जामिनावर सुटका

गोव्यातल्या फेब इंडिया शोरुम मधल्या छुपा कॅमेरा प्रकरणातल्या चारही आरोपींना म्हापसा कोर्टानं जामीन मंजूर केलाय.

Updated: Apr 4, 2015, 11:41 PM IST
गोवा छुपा कॅमेरा प्रकरण : चौघांची जामिनावर सुटका title=

पणजी : गोव्यातल्या फेब इंडिया शोरुम मधल्या छुपा कॅमेरा प्रकरणातल्या चारही आरोपींना म्हापसा कोर्टानं जामीन मंजूर केलाय.

या चौघांना गोवा न सोडण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आलाय. शोरुमच्या चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा लावल्या प्रकरणी, परेश भगत, प्रशांत नाईक, राजू पायनांशी आणि करीम लाखानी या चार कर्मचा-यांना अटक करण्यात आली होती. 

दरम्यान शोरूममध्ये सीसीटिव्ही कॅमेरे असून ट्रायल रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा युक्तीवाद फेब इंडियाच्या वकिलांनी केलाय. याप्रकरणी फेब इंडियाचे सीईओ शुभ्रतो दत्ता आणि व्यवस्थापकीय संचालक खेरा यांनाही चौकशीसाठी बोलावणार असल्याचं कळतंय. 

गोवा फेब इंडियाच्या व्यवस्थापक चित्राली सावंत फरार असून ,त्यांच्या तपासासाठी पोलिसांची दोन पथकं मुंबई आणि दिल्लीला रवाना झालीत. कर्नाटकातील तायको कंपनीकडून हे सीसीटीव्ही बसवण्यात आल्यानं त्यांच्या अधिका-यांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलंय. 

विशेष म्हणजे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी या फॅब इंडियाच्या शोरूममध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथे त्यांना चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा आढळला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.