नवी दिल्ली: उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नाराजीमुळं राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरुन दिल्लीत खलबतं सुरु आहेत. याच संदर्भात दिल्लीत दहा जनपथवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधीची भेट घेतली.
या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि सुशील कुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी या नेत्यांनी राज्यातल्या परिस्थितीची माहिती सोनिया गांधींना दिली. तसंच नारायण राणे यांच्या नाराजीबाबतही या बैठकीत चर्चा झालीय.
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मनधरणीचे उद्या प्रयत्न करण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उद्या नारायण राणेंची भेट घेऊन त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती या बैठकीनंतर मिळतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.