'कॅम्पा कोला'ला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या 'कॅम्पा कोला'वासियांना अखेर सुप्रीम कोर्टाने आज मोठा दिलासा दिला आहे. कॅम्पा कोलातील बेकायदा फ्लॅट्स कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार तसंच महापालिका प्रशासनाला दिल्यानं रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Updated: Jan 30, 2015, 09:11 PM IST
'कॅम्पा कोला'ला सुप्रीम कोर्टाचा दिलासा title=

नवी दिल्ली: न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या 'कॅम्पा कोला'वासियांना अखेर सुप्रीम कोर्टाने आज मोठा दिलासा दिला आहे. कॅम्पा कोलातील बेकायदा फ्लॅट्स कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार तसंच महापालिका प्रशासनाला दिल्यानं रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

न्यायालयाच्या या निर्णयामुळं 'कॅम्पा कोला' वसाहतीतील १४० कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.
वरळीतील कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील मिडटाऊन, ऑर्किड, शुभम अर्पाटमेंट, ईशा-एकता, पटेल, बी.वाय. अर्पाटमेंट या सात इमारतींचे एकूण ३५ मजले अनधिकृत असून त्यात १४० फ्लॅट आहेत. 

महापालिकेच्या फ्लॅट पाडण्याच्या कारवाईला कॅम्पा कोलावासियांनी मोठा विरोध केला होता. त्यांच्या मदतीला अनेक राजकीय पुढारीही धावून आले होते. परंतू अधिकाऱ्यांनी कायद्याचा बडगा उगारल्यानंतर कॅम्पाकोला वासियांनी कायद्याचा आधार घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. रहिवाशांनी आधी हाय कोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टात अपील केले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.