नवी दिल्ली : नेस्ले इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सुरेश नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नारायणन हे मागील सोळा वर्षांत नेस्ले इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती होणारे पहिले भारतीय आहेत.
येत्या १ ऑगस्टपासून कंपनीचे वर्तमान व्यवस्थापकीय संचालक एटियंस बेनेट यांच्याऐवजी नारायणन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणार आहेत.
नेस्लेचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या मॅगीवर देशभरात बंदी आल्यानंतर आता कंपनीच्या धोरणाचा भाग म्हणून नेस्ले इंडियाने आपल्या संचालक मंडळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मॅगीच्या नमुन्यांमध्ये शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट आढळल्यामुळे देशभरात मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. त्या प्रकरणानंतर कंपनीने संचालक मंडळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी विरोधात नेस्लेनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.