नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फरार आरोपी ललित मोदी याच्याशी नक्की काय नातं आहे हे स्पष्ट करावं, अशी मागणी करत सुषमा स्वराज प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपावर चांगलाच हल्ला चढवला आहे. गेल्या वर्षी ललित मोदींनी पत्नीच्या कर्करोगावरील उपचारासाठी व्हिसा मिळण्यासाठी सहाय्य मिळावं अशी मागणी केली होती.
स्वराज यांनी इंग्लंडचा आसरा घेतलेल्या मोदींना असा व्हिसा द्यावा त्यास भारत हरकत घेणार नाही असं कळवलं आणि फरार आरोपीला सहाय्य केलं. आयपीएल बेटिंग, पैशाची अफरातफर आदी प्रकरणी शेकडो कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये ललित मोदी यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनायला हवे आहेत, परंतु ललित मोदी इंग्लंडमध्ये लपून बसले आहेत, असं असताना स्वराज यांनी अशा फरार आरोपीला का मदत केली? असा प्रश्न विचारला आणि यामागे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचेही संबंध आहेत का अशी विचारणा काँग्रेसचे नेते रणदीप सर्जेवाला यांनी केली आहे.
दरम्यान, स्वराज यांची मुलगी बासुरी आणि तिचे पती स्वराज कौशल या दोघांनी मोदी यांच्यासाठी वकिली केली असल्याचं समोर आलंय. त्यामुळं स्वराज यांचे हितसंबंध गुंतले असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे.
स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे, तसंच स्वराज यांनी समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, राजनाथ सिंह, अमित शाह आणि भाजपानं स्वराज यांची पाठराखण केली आहे आणि केवळ मानवतावादी दृष्टीकोनातून सहाय्य केल्याचं सांगितलं.
(with IANS inputs)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.