www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ही कहाणी आहे एक मुलीची... आयुष्यात केवळ अपमान आणि धक्क्यांशिवाय तिला काहीच मिळालेलं नाही... खूप खूप मन भरून आलंय... पण, तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळायला असमर्थ ठरतात...
एका झोपडपट्टीत राहणारी ही मुलगी रस्त्यावर कचरा, प्लास्टिक गोळा करते. खेळण्या-बागडण्याच्या वयात तिला कामाला जुंपलं जात... पण, ती एकदम गपचूपपणे, भावना शून्यतेनं ते स्वीकारते. आपली आई वेश्या आहे... शरीर विकून ती आपल्याला पोसते हे सत्यही अगदी नकळत्या वयातच तिच्या अंगावर कोसळतं... तरीही ती रडत नाही...
लहान भावाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर रस्त्यावरचं रक्तानं माखलेलं त्याचं प्रेत पाहूनही ती रडत नाही...
लहान वयातच तीचं लग्न एका वयस्कर व्यक्तीसोबत लावून दिलं जातं... त्यानंतरही ती गप्पच राहिली... ना रडली... ना आक्रोश केला... याच नकळत्या वयात ती एका बाळाची आईही बनते... पण, तरीही ती भावनाशून्यच...
तिला रडायचंय... खूप खूप रडायचंय... मग, ती रडत का नाही? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा... तुमच्या डोळ्यांत अश्रू दाटण्याची शक्यता आहे...
व्हिडिओ पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.