नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्या मुलाच्या विवाह स्वागत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली.
दिग्विजय यांचा मुलगा जयवर्धन आणि बिहारच्या गया जिल्हयातील संस्थानिक घराण्यातील शत्रुंदम शाही यांची मुलगी श्रीजमय यांचा शाही विवाह सोहळा दिल्लीत पार पडला. या कार्यक्रमाला सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली.
जयवर्धन आमदार असून मध्य प्रदेशमधील राघोर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. दिग्विजय सिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कठोर टीकाकार आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी मुलायसिंह यादव यांच्या कुटुंबातील एका सोहळ्यालाही हजेरी लावली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.