जम्मू/नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात मागील बुधवारी बीएसएफ जवानांच्या तुकडीवर हल्ला केल्यानंतर जिवंत पकडला गेलेला दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब याच्या चौकशीमध्ये अनेक महत्त्वाची माहिती पुढे आलीय. या हल्ल्यात दोन कॉन्स्टेबल शहीद झाले.
मीडियामध्ये आलेल्या रिपोर्टनुसार नावेद हल्ल्याच्या ४५ दिवस आधी भारतात एका गुफेत लपून बसला होता. यादरम्यान त्यानं अनेक लोकांची भेट घेतली. तपास यंत्रणांच्या चौकशीमध्ये त्यानं ही माहिती दिली. एका इंग्रजी वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार नावेदला त्याच्या कोणत्याही सहकारी दहशतवाद्याचं खरं नाव माहित नाहीय. तो सगळ्यांना कोड नावानं ओळखतो.
पाकिस्तानच्या फैसलाबाद मधील राहणारा २३ वर्षीय नावेदकडून चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जवळपास एक डझन जणांची चौकशी केली जात आहे.
रिपोर्टनुसार नावेदनं सांगितलं की तो फैसलाबादचा राहणारा आहे. त्याचे वडील मजूरी करतात, आई गृहिणी आहे. तो पाचव्या वर्गानंतर शाळेत गेला नाही. सुरूवातीला आपल्या वडिलांना कामात तो मदत करत होता. २०११ मध्ये नावेद लष्करच्या संपर्कात आला. बशीर नावाच्या एका व्यक्तीनं त्याला फैसलाबादच्या लष्कराच्या कार्यालयात नेलं. त्याच वर्षी हबीबुल्लाहमध्ये २१ दिवसांचं त्याचं ट्रेनिंग झालं. त्यानंतर बशीरनं त्याला मुझफ्फराबादच्या लष्करच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये तीन महिन्याच्या ट्रेनिंगसाठी पाठवलं. यादरम्यान त्याला एके-४७ सह अनेक हत्यार चालवण्याचं ट्रेनिंग दिलं गेलं.
मिळालेल्या माहितीनुसार नावेद जूनच्या सुरूवातीच्या आठवड्यात सीमारेषा पार करून आपल्या सहकाऱ्यांसोबत भारतात आला. तो गुलमर्गच्या नुरी सेक्टरमधून भारतात शिरला होता. नावेदनं सांगितलं की, ट्रेनिंग कॅम्पपासून नूरी सेक्टर मध्ये येण्यापूर्वी तो सात दिवस पायी चालला होता. नावेद आणि इतर दहशतवाद्यांना एका ट्रक ड्रायव्हरनं उधमपूर हायवेपर्यंत सोडलं होतं.
चौकशीदरम्यान नावेदनं सांगितलं की, तो तंगमार्ग आणि बाबा रेशीमघ्ये थांबला होता. त्यानंतर तो दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुरा-पुलवामा आला आणि पहाडांमधील एका गुफेत राहिला. चारही दहशतवादी फैयाज आणि जावेद अहमद नावाच्या दोघा भावांच्या घरी थांबले होते. या दोघांकडे राहिल्यानंतर नावेद आणि नोमान खीरी नावाच्या गुफेत राहायला गेला. या गुफेत तो ४५ दिवस होता. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या दोन वेगवेगळ्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर नावेद तीन इतर लोकांसोबत उत्तर काश्मीरमध्ये बारामुल्लाच्या रस्त्यानं भारतात शिरला होता. सीमेवरील तार कापून ते आत आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.