युपीत पोलिसांना पळवून पळवून मारले

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये आज पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. यावेळी जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला.

Updated: Jul 25, 2014, 08:39 PM IST
युपीत पोलिसांना पळवून पळवून मारले title=
फाईल फोटो

लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये आज पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. यावेळी जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला.

शिया वक्फ बोर्डमधील घोटाळ्याची चौकशी व्हावी, या मागणीसाठी काही आंदोलकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या बंगल्याला घेराव घातला. यावेळी जमाव हिंसक झाला.

आझम खान यांनी वक्फ बोर्डात घोटाळा केल्याचा त्यांचा आरोप होता. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांवरच जोरदार हल्ला चढवला.
 
पोलिसांनी घेरून आंदोलकांनी त्यांना बेदम चोप दिला. अगदी पोलिसांना पळवून पळवून आंदोलकांनी मारले. लखनौच्या रस्त्यांवर ही धुमश्चक्री रंगली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.