13 जिल्ह्यांमधल्या जंगलात अग्नीतांडव

उत्तराखंडमधील जंगलात भीषण आग लागलीये. या आगीमुळे डेहहाडून पासून नवी दिल्ली पर्यंत सर्व प्रशासकीय व्यवस्था हादरुन गेली आहे. 

Updated: Apr 30, 2016, 10:47 PM IST
13 जिल्ह्यांमधल्या जंगलात अग्नीतांडव title=

डेहहाडून: उत्तराखंडमधील जंगलात भीषण आग लागलीये. या आगीमुळे डेहहाडून पासून नवी दिल्ली पर्यंत सर्व प्रशासकीय व्यवस्था हादरुन गेली आहे. आगीमुळे 10 पर्वतीय जिल्ह्यांना विळखा पडला आहे, तर 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी NDRFच्या तीन तुकड्यां तैनात करण्यात आल्या आहेत, यामध्ये 135 जवानांचा समावेश आहे.   

ही आग आटोक्यात आणण्यासाठी वायुसेनेलाही पाचारण करण्यात आलं आहे. वायुसेनेनं MI -17 हेलिकॉप्टरसह 11 जणांच्या टीमला तातडीनं पाठवलं आहे. या आगीमुळे उत्तराखंडमधील 13 जिल्ह्यातलं 19 हजार हेक्टरवरील वनक्षेत्र जळून खाक झालंय.