विलासरावांच्या प्रकृतीत सुधारणा

चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या विलासरावांच्या प्रकृतीत सुधारणा झालीय. त्यांच्या शरीरातलं ब्ल़ड इन्फेक्शन ब-याच प्रमाणात कमी झालंय. त्यांचा ब्लड प्रेशरही नॉर्मल असल्याची माहिती हॉस्पिटलनं दिलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 9, 2012, 03:40 PM IST

www.24taas.com, चेन्नई
चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या विलासरावांच्या प्रकृतीत सुधारणा झालीय. त्यांच्या शरीरातलं ब्ल़ड इन्फेक्शन ब-याच प्रमाणात कमी झालंय. त्यांचा ब्लड प्रेशरही नॉर्मल असल्याची माहिती हॉस्पिटलनं दिलीय.
विलासरावांच्या प्रकृतीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज मुंबईत प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात प्रार्थना केली. यावेळी कार्यकर्त्यांनी विलासरावांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी पूजाही केली. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यावेळी उपस्थित होते.
विलासरावांवर उपचार सुरू असलेल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये परवानगी नसताना लातूरच्या दोन डॉक्टरांनी प्रवेश केल्याची माहिती समोर आलीय. विलासरावांचे फॅमिली डॉक्टर असल्याचं सांगत त्यांनी हॉस्पिटमध्ये प्रवेश केला. डॉ. हंसराज बाहीती आणि डॉ. बी. एम. चिंते अशी त्यांची नावं आहेत.
विलासरावांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी हे दोन्ही डॉक्टर विनापरवानगी हॉस्पिटलमध्ये घुसले होते. ग्लोबल हॉस्पिटलच्या व्यवस्थापनानं या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केलीये.