नवी दिल्ली : टाटा आणि एसआयएच्या संयुक्त उपक्रमानुसार डोमेस्टीक एअरलाईन्स कंपनी विस्ताराने दिवाळीसाठी काही विशेष डिस्काऊंट ऑफर सादर केलेल्या आहेत. या नुसार कमीत कमी भाडे 920 रूपये असणार आहे.
या ऑफरनुसार प्रवाशांना एका बाजूने प्रवासाचं तिकिट कमीत कमी 920 रूपये असणार आहे. यात सर्व प्रकारचे चार्जेस असतील. या किमतीत सर्व प्रकारचे चार्ज सामिल असतील, ही ऑफर 26 ते 31 ऑक्टोबर दरम्यान तिकीट बुक केल्यावरच मान्य असेल.
या ऑफर नुसार पॅसेंजर 30 आणि 31 ऑक्टोबरला प्रवास करू शकतात. किंवा 10 नोव्हेंबरपासून 25 मार्च 2017 दरम्यान हवाई यात्रा करता येणार आहे.
याशिवाय, एकाच दिवसाशी बुक होणाऱ्या 250 तिकिटावर फर्स्ट क्लासचं अपडेटही मिळणार आहे. या ऑफर नुसार बुकिंग नॉन रिफंडेबल असणार आहे, ही ऑफर फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर असेल.