व्यापम घोटाळा : नम्रताचं नाक-तोंड दाबून 'खून' झाल्याचं उघड

व्यापम घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच या प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय. या घोटाळ्यातीचा ३५ वा बळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नम्रता दामोर हिनं आत्महत्या केली नव्हती, तर तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता, असं आता स्पष्ट झालंय. 

Updated: Jul 9, 2015, 12:13 PM IST
व्यापम घोटाळा : नम्रताचं नाक-तोंड दाबून 'खून' झाल्याचं उघड title=

नवी दिल्ली : व्यापम घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच या प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय. या घोटाळ्यातीचा ३५ वा बळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नम्रता दामोर हिनं आत्महत्या केली नव्हती, तर तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता, असं आता स्पष्ट झालंय. 

गेली दोन वर्ष पोलिसांनी हे आत्महत्येचंच प्रकरण असल्याचं म्हटलं होतं. परंतु, पोस्टमॉर्टेम अहवालात हा मृत्यू प्राकृतिक असूच शकत नाही... नम्रता हिची गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वी नम्रता हिच्या वडिलांची मुलाखत घेतल्यानंतर काही वेळातच एका टीव्ही पत्रकाराचा संशयास्पद पद्धतीनं मृत्यू झाला होता. 

२०१२ मध्ये मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या नम्रताचं प्रेत मध्यप्रदेशच्या उज्जैनच्या रेल्वे ट्रॅकवर आढळलं होतं. शव मिळाल्यानंतर २२ दिवसांनी तिच्या भावाला दिपेंद्रला तिची ओळख पटली होती. त्यानंतर या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर करताना पोलिसांनी हे 'आत्महत्ये'चं प्रकरण असल्याचं म्हटलं होतं. 

पोलिसांचा हा अहवाल पोस्टमॉर्टेम अहवालाहून अगदी उलट होता. पोस्टमॉर्टेमच्या अहवालानुसार, नम्रताचा मृत्यू हिंसक पद्धतीनं नाक-तोंड दाबून श्वास कोंडल्यानं झालाय... आणि यामुळेच नम्रताची हत्या झाली होती, हे स्पष्ट होतंय असं पोस्टमॉर्टेम अहवाल सांगतोय. 

चुकीच्या पद्धतीनं मेडिकल प्रवेश परीक्षा पास करणाऱ्या इतर उमेदवारांपैंकीच नम्रताही एक होती. कथित स्वरुपात, ही परीक्षा पास करण्यासाठी राजकारणी आणि नोकरशहांना इच्छुकांनी लाच दिली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.