राहुल गांधींच्या 'त्या' दीर्घ सुट्टीचे गुपित उघडले

फेब्रुवारीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दोन महिन्यांच्या दीर्घ सुट्टीवर गेले होते. ते नेमके कुठे गेले होते याची माहिती मात्र कोणालाच नव्हती. फेब्रुवारी महिन्यात संसदेचे अधिवेशन सुरु असतानाच राहुल गांधी सुट्टीवर गेले होते. अधिवेशनादरम्यान राहुल यांच्या अनुपस्थितीवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात सवाल उपस्थित केले होते.

Updated: Nov 26, 2015, 11:39 AM IST
राहुल गांधींच्या 'त्या' दीर्घ सुट्टीचे गुपित उघडले title=

नवी दिल्ली : फेब्रुवारीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दोन महिन्यांच्या दीर्घ सुट्टीवर गेले होते. ते नेमके कुठे गेले होते याची माहिती मात्र कोणालाच नव्हती. फेब्रुवारी महिन्यात संसदेचे अधिवेशन सुरु असतानाच राहुल गांधी सुट्टीवर गेले होते. अधिवेशनादरम्यान राहुल यांच्या अनुपस्थितीवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात सवाल उपस्थित केले होते. यादरम्यान राहुल गांधी विदेश दौऱ्यावर गेल्याची माहिती मिळाली. मात्र ते कोणत्या ठिकाणी गेलेत? भारतात कधी येणार? याबाबत कोणालाच काही माहिती नव्हती. 

दुसरीकडे काँग्रेसनेही याबाबत मौन धारण केले होते. त्यामुळे राहुल नक्की गेले तरी कुठे होते याबाबतची उत्सुकता साऱ्यांच्याच मनात होती. राहुल गांधी दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर भारतात परतले. यादरम्यान त्यांचा एक फोटोही नेटवर वायरल झाला होता. त्याद्वारे ते कुठल्यातरी सेमिनारला उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, त्यानंतरही काँग्रेसने याबाबतची माहिती दिली नाही. पण, आता मात्र राहुल गांधींच्या त्या दीर्घ सुट्टीचे गुपित उघडलंय. 'इंडिया टुडे' या इंग्रजी मॅगझीनने ही माहिती उघड केलीय. १६ फेब्रुवारी ते १६ एप्रिल या दोन महिन्यांचा राहुल यांच्या विदेश दौऱ्याचा संपूर्ण लेखाजोगाच या मॅगझीनमध्ये देण्यात आलाय. 

असा  होता राहुल गांधींचा दोन महिन्यांचा दौरा

  • १६ फेब्रुवारी २०१५ राहुल  दिल्लीहून बँकाकसाठी रवाना झाले. त्यांनी एक दिवस बँकॉकमध्ये घालवला.
  • १७ फेब्रुवारीला राहुल बँकॉकहून कंबोडियाची राजधानी नामपेन्ह येथे पोहोचले आणि ११ दिवस तिथं राहिले. 
  • २८ फेब्रुवारी ते बँकॉकला आले आणि १ मार्चला ते म्यानमारसाठी रवाना झाले. म्यानमारमध्ये ते २१ दिवस राहिले. 
  • २२ मार्चला म्यानमारहून थायलंडंमध्ये पोहोचले. इथं त्यांनी ९ दिवस मुक्काम केला. 
  • ३१ मार्चला ते व्हिएतनामसाठी रवाना झाले. इथं ते तब्बल १२ दिवस तळ ठोकून होते. 
  • १२ एप्रिल २०१५ ला ते पुन्हा चार दिवसांसाठी थायलंडला आले
  • १६ एप्रिलला ते दिल्लीत पोहोचले

राहुल गांधींनी दोन महिन्यांत चार देशांचा दौरा केला. सर्वाधिक २१ दिवस ते म्यानमारमध्ये राहिले. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल यांच्यासह त्यांचे मित्र समीर शर्माही त्यांच्यासोबत होते. ते लंडनहून सरळ बँकॉकला पोहोचले होते. समीरच्या व्यतिरिक्त राहुल यांच्यासह सुरक्षेसाठी एसपीजीचे दोन जवानही त्यांच्यासोबत होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.