बंगळूरू : चालत्या कारमध्ये पत्नीनं पतीवर तीन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बंगळुरुमध्ये घडलीय. या हल्ल्यातून त्यानं कशीबशी सुटका करुन घेण्याचाही प्रयत्न केला आणि गाडीतून बाहेर आला. त्यानंतर तो एका बसमध्ये चढला आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र इथंही तो या महिलेनं त्याचा पाठलाग करत बस गाठली आणि त्याच्यावर हल्ला केला. बसमधील प्रवाशांनी या महिलेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. पत्नीने केलेल्या हल्ल्यात या व्यक्तीला पोटात तीन गोळ्या लागल्यात.
पीडित व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या दोघांचं 20 वर्षांपूर्वी लग्न झालंय. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये खटके उडत होते. तमिळनाडूहून परतत असताना गाडीत दोघांत पुन्हा वाद झाला. पतीनं हात उगारल्याने पत्नीनं रागाच्या भरात त्याच्यावर पिस्तुल रोखत तीन गोळ्या झाडल्या.