नवी दिल्ली : चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज संसदेचं कामकाज पुन्हा सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशनातील शेवटचे तीन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. नोटबंदीवरुन विरोधकांचा गदारोळ सुरुच रहाण्याची चिन्हं आहेत. दरम्यान भाजपनं राज्यसभा आणि लोकसभेतील खासदारांसाठीही या तीन दिवसांसाठी व्हिप जारी केला आहे.
पंतप्रधान मोदी कामकाजात सहभागी होणार असल्यानं नोटाबंदीवर ते संसदेत बोलणार का याकडे सा-यांचं लक्ष लागलंय. 16 नोव्हेंबरला संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं होतं. मात्र नोटाबंदीच्या निर्णयावरुन विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. विरोधकांच्या गोंधळामध्येच हे हिवाळी अधिवेशन सुरु आहे.