लखनऊ : प्रत्येक महिलेचे आई होण्याचं स्वप्न असतं पण त्यासाठी एक वेळ आणि वय असतं... याला एक अपवाद नुकताच जगासमोर आला आहे. वयाच्या ७० व्या वर्षी एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म देण्याचा प्रकार समोर आला आहे.
डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार उत्तर प्रदेशातील उत्तर भागात असलेल्या एका गावातील ओमकारी सिंह या महिलेने ७० व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. आतापर्यंत कोणत्याही म्हाताऱ्या महिलेने या वयात मुलांना जन्म देण्याचा कोणतीही माहिती नाही त्यामुळे हा एक विक्रमच आहे.
जुळे मुलं जन्माला आली तेव्हा ओमकारी यांनी त्यांचे नाव आकाशवाणी आणि दुसऱ्या मुलाचे नाव बरसात ठेवले. पण दुर्दैवाने जन्मानंतर काही दिवसांत ओमकारी यांच्या दुसरा मुलगा 'बरसात'चा मृत्यू झाला. त्यानंतर आकाशवाणीच या दाम्पत्यांचे जीवन बनले.
ओमकारी यांचे वय आता ७६ झाले असून वृद्धापकाळामुळे त्यांना आता मुलगाचे संगोपन करणे कठीण झाले आहे. ओमकारीचे पती चरण हे सध्या ८९ वर्षांचे आहे. वृद्ध असल्यामुळे मुलाला इतर वडिलांप्रमाणे उचलू शकत नाही. ओमकारी सिंह यांची एक मुलगी होती. अनेक वर्ष झाले तरी दुसरा मुलगा झाला नाही आणि वय निघून गेले. पण मुलांची आस त्यांनी सोडली नाही. मग त्यांनी आय.व्ही.एफ तंत्रज्ञानामुळे मुलाला जन्म देण्याचे ठरविले.
ओमकारी यांनी मान्य केले की या वयात मुलांचा पालन पोषण करणे अवघड असते. त्याच्या मागे पळणे, जेवण तयार करणे खूप कठीण काम आहे. पण येवढं असून ओमकारी सिंह निश्चिंत आहेत की त्यांच्या जाण्यानंतर त्यांची ५० वर्षीय मुलगी कमला या मुलाचे संगोपन करू शकेल. कमलचे पतींचा या दाम्पत्याला खूप पाठिंबा आहे.
यात विशेष म्हणजे ओमकारी सिंह यांचे पती चरण यांना आपल्या मुलाचे लग्न होतांना पाहायचे आहे. ते जास्त जास्त वेळ आपल्या मुलासोबत घालवतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.