नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिश्रा यांना धमकीची चिठ्ठी मिळालीये. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीला मुदतवाढ देण्याचा अर्ज मिश्रा यांनी फेटाळला होता. मिश्रा यांच्या निवासस्थानी धमकीचं चिठ्ठी मिळाली आहे. या प्रकरणाची दखल घेत दिल्ली पोलीस अधिक तपास करत आहेत.
दिल्ली पोलिसांत याबद्दल तक्रार दाखल करण्यात आलीय. 'कितीही सुरक्षा मिळवली तरी आम्ही तुला संपवू' अशी धमकी या बेनामी पत्रात देण्यात आलीय.
३० जुलै रोजी पहाटे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला नागपूर तुरुंगात फाशी देण्यात आली होती. यानंतर लगेचच न्यायमूर्ती मिश्रा यांच्यासह अमितन रॉय आणि प्रफुल्ल या त्यांच्या दोन सहकाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. या तीन न्यायमूर्तींनी याकूबची शेवटच्या घटकेला मध्यरात्री दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.