www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
मी जन्माने राष्ट्रवादी हिंदू आहे आणि राष्ट्रवादी होणे काही गुन्हा नाही, असे रोखठोक मत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगली जे काही केले ते योग्यच केले. त्याच्यासाठी कोणताही पश्चाताप मी करीत नसल्याचे वक्तव्य करून नरेंद्र मोदी यांनी एका नवीन वादाला तोंड फोडलं आहे.
या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, त्या वेळी झाले त्याबद्दल काही पश्चाताप तुम्हांला वाटतो का, ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने विशेष तपास पथक स्थापन केले होते. त्या एसआयटीच्या तपासणीनंतर मला क्लिन चीट देण्यात आली आहे, दुसरे असे की दुःख तर वाटते की काहीही चुकीचे झाल्यावर. तुम्ही गाडी चालवत असाल किंवा दुसरा कोणी ड्रायव्हिंग करत असेल आणि तुम्ही शेजारी बसले असाल. त्यावेळी कुत्र्याचं पिल्लू गाडी खाली आले तर तुम्हांला दुःख तर होते. दुःख होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही चूक केली आहे.
२००२ मध्ये झालेल्या दंगलीमुळे तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे याचा तुम्हांला त्रास होत नाही का? मोदी म्हणाले, प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन वेगळा असतो. लोकांना टीका करण्याचा अधिकार आहे. पण अस्वस्थ तेव्हा होते जेव्हा तुम्ही चूक केली असेल. मी काही चुकीचे केले, मी चोरी केली आणि पकडला गेलो तर अस्वस्थ होते की मी पकडलो गेलो. या ठिकाणी परिस्थीती वेगळी आहे.
२००२ मध्ये तुम्ही जे काही केले ते योग्य होते का? असे विचारले असता मोदी म्हणाले, बिल्कुल, जितकी अक्कल मला ईश्वराने दिली आहे, जितका अनुभव माझ्या जवळ आहे आणि त्या परिस्थितीत जितकी ताकद माझ्याकडे होती, ती पाहून मी जे काही केले ते योग्यच होते. याची तपास एसआयटीने लावला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.