डिझेल-केरोसीनमध्ये १० रुपये वाढ?

डिझेल आणि केरोसिनचे भाव तब्बल 10 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयानं याबाबतचा प्रस्ताव तयार केलाय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 27, 2012, 09:30 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
डिझेल आणि केरोसिनचे भाव तब्बल 10 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयानं याबाबतचा प्रस्ताव तयार केलाय. तेल कंपन्यांना होणारा 1 लाख 60 हजार कोटी रुपयांचा तोटा अंशतः कमी करण्यासाठी हा प्रस्ताव ठेवल्याचं मंत्रालयातल्या सूत्रांनी म्हटलंय.
डिझेल दरवाढ झाल्यास परिणामी सर्वच क्षेत्रांमध्ये महागाई वाढण्याची भीती आहे. रॉकेलचा वापरही दारिद्र्यरेषेखालील लोकच अधिक करत असल्यानं या गटालाही दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. 14 सप्टेंबरला डिझेलचे दर 6 रुपयांनी वाढवण्यात आले होते.
आता पुढल्या 10 महिन्यांसाठी भाववाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. तसंच गेल्यावर्षी जून महिन्यानंतर आता केरोसिनची दरवाढ पुढल्या 2 वर्षांसाठी असेल, असं सूत्रांनी म्हटलंय