www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान राज परवेझ अशरफ यांनी पदाची सुत्रे हाती घेतली तरी मागील सरकारमधील जुनेच चेहरे कायम ठेवले आहे. युसूफ रजा गिलानी यांच्या मंत्रिमंडाळातील मंत्र्यांकडे पूर्वीचीच खाते ठेवली आहेत.
हिना रब्बानी खार पुन्हा परराष्ट्र मंत्रीपदी कायम ठेवण्यात आले आहे. तर कमर जमान कायरा यांना सूचना मंत्रालयाचा कामभार सोपविण्यात आला आहे. नवेद कमर यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचे खाते देण्यात आले आहे. चौधरी परवेज इलाही यांना बढती देण्यात आली आहे. त्यांच्यावर उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मंत्रिमंडळात मखदूम अमीन फहीम (वाणिज्य मंत्री), अरबाब आलमगीर खान (दूरसंचार मंत्री), नजर मुहम्मद गोंडाल (विकासमंत्री), राणा मुहम्मद फारूक सईद खान (जलवायू परिवर्तन), अब्दुल हफीज शेख (वित्त), मीर हजर खान बाजरानी (आंतरराष्ट्रीय समन्वय) , मंजूर वट्टू (काश्मीर मामले), फारूक नईक (कायदा मंत्री) आदींचा समावेश आहे.