पाकिस्तानचे नवे पंतप्रधान : मखदूम शहाबुद्दीन

पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानींना मंगळवारी सुप्रीम कोर्टानं पदासाठी अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधानपदावर आता कोण? याबद्दल चर्चा सुरू झाली होती. यानंतर सत्ताधारी पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी)नं मखदूम शहाबुद्दीन यांची पंतप्रधान पदासाठी निवड केल्याचं समजतंय.

Updated: Jun 20, 2012, 12:12 PM IST

 www.24taas.com, इस्लामाबाद  

 

पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानींना मंगळवारी सुप्रीम कोर्टानं पदासाठी अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधानपदावर आता कोण? याबद्दल चर्चा सुरू झाली होती. यानंतर सत्ताधारी पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी)नं मखदूम शहाबुद्दीन यांची पंतप्रधान पदासाठी निवड केल्याचं समजतंय. पाकिस्तानी मीडियाच्या म्हणण्यानुसार पीपीपीच्या बैठकीत मखदूम शहाबुद्दीन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय. मखदूम हे सध्या पाक सरकारमध्ये वस्त्र मंत्रालय सांभाळत आहेत. संसदेत आज औपचारिकरित्या मखदूम यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

मखदूम शहाबुद्दीन हेही गिलानींप्रमाणेच अध्यात्मिक परिवाराशी संबंधित आहेत. सूफी संत शाह-रुख-ए आलम यांच्या मकबऱ्याचे संरक्षक म्हणून हा परिवार अजूनही ओळखला जातो. 2008 पासून गिलानी यांच्या कार्यकाळात शहाबुद्दीन यांनी वेगवेगळ्या मंत्रालयाचा कारभार उत्तमरित्या सांभाळला आहे. मंगळवारी पाकिस्तान सुप्रीम कोर्टान युसूफ रझा गिलानी यांना अपात्र घोषित करून त्यांना पदावरून पायउतार होण्याचे आदेश दिले आहेत. झरदारी यांच्याविरोधात भ्रष्टाचार उघड करण्यात अपयशी झालेल्या गिलानींना न्यायालयानं दोषी ठरवलंय. गिलानी यांना अयोग्य ठरवून तशी अधिसूचना लागू करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टानं पाकिस्तान निर्वाचन आयोगाला दिले होते.

 

डिसेंबर 2009 साली सुप्रीम कोर्टानं परवेज मुशर्रफ यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये माफीची याचिका धुडकावून लावली होती. या प्रकरणात भ्रष्टाचारी निर्णयांच्या सहाय्यानं झरदारी यांच्यासहीत आठ हजारांहून अधिक लोकांनी सरळसरळ फायदा उठवल्याचं पुढे आलं होतं. तेव्हापासूनच पाकिस्तानात न्यायव्यवस्था आणि सरकार यांच्यामधील मतभेदाला पासून सुरू झाली होती.

 

.