फेसबुकवर चॅट करताना महिलेची आत्महत्या

तैवानमध्ये एका महिलेने आपल्या मित्रमंडळीशी फेसबुकवर चॅट करत असताना विषारी द्राव ओढत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या महिलेच्या मित्रमंडळींनी पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही.क्लेअर लिनने आपल्या ३१व्या वाढदिवसाच्या दिवशी १८ मार्चला आत्महत्या केली. क्लेअर लिनच्या कुटुंबातील सदस्यांना तिच्या फेसबुकवरील संभाषणाविषयी कोणतही कल्पना नसल्याचे तैपईचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Updated: Mar 28, 2012, 10:25 AM IST

www.24taas.com, तैपई

 

तैवानमध्ये एका महिलेने आपल्या मित्रमंडळीशी फेसबुकवर चॅट करत असताना विषारी द्राव ओढत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या महिलेच्या मित्रमंडळींनी पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही.क्लेअर लिनने आपल्या ३१व्या वाढदिवसाच्या दिवशी १८ मार्चला आत्महत्या केली. क्लेअर लिनच्या कुटुंबातील सदस्यांना तिच्या फेसबुकवरील संभाषणाविषयी कोणतीही कल्पना नसल्याचे तैपईचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

लिनच्या फेसबुकवरील शेवटच्या एण्ट्रीवरुन ती नऊ जणांशी चॅट करत असल्याचं आढळून आलं आहे. क्लेअरने मोबाईल फोनवरुन अपलोड केलेल्या एका फोटोत दोन जनावरं कोळशाच्या शेगडीवर जळत असल्याचं दिसतं. तर दुसऱ्या एका फोटोत खोली धूराने भरून गेल्याचं दिसून येतं. क्लेअरचा एका मित्राने शांत राहा, खिडकी उघड आणि मी भीक मागतो कोळसे विझून टाक असं तिला सांगत असल्याचं चॅटवरुन स्पष्ट झालं आहे. त्यावर धुराने मला गुदमरल्यासारखं होतं आहे आणि माझे डोळे अश्रूंनी भरुन गेले आहेत आता मला अधिक काही लिहू नकोस असं उत्तर लिनने दिलं आहे.

 

फेसबुकच्या तिच्या मित्रमंडळींनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण कोणीही पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. आता खूप उशिर झाला आहे. माझी खोली धुराने भरुन गेली आहे. मी आणखी एक पिक्चर पोस्ट केलं आहे. आणि मी मरत असले तरी मला फेसबुक हवं आहे, असं लिनने पोस्ट केलं आहे. लिनच्या एका मित्राने ६७ मिनिटात कोणीही पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न न केल्याबदद्ल पश्चातापाची भावना व्यक्त केली आहे. पण तिला शोधून काढणं कठिण गेलं असतं असंही म्हटलं आहे. क्लेअरचा पत्ता किंवा फोननंबर शिवाय तिला शोधणं कठिण होतं असं तिच्या मित्राने म्हटलं आहे.

 

 

क्लेअरचा बॉयफ्रेंड तिच्याकडे दुर्लक्ष्य करत असल्यामुळे ती दु:खी होती आणि तिच्या वाढदिवसाच्या दिवशीही तो तिला भेटायला आला नव्हता. क्लेअरच्या मित्राला दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला आणि मग त्याने तिच्या कुटुंबाला संपर्क केला. तैवानच्या विद्यापीठातील एका समाजशास्त्रज्ञाने इंटरनेट युगात माणून सामाजिक दृष्ट्या किती एकाकी होतो याची ही घटना ज्वलंत उदाहरण असल्याचं मत व्यक्त केलं आहे.