एका लग्नाची 'डोळ्यात पाणी आणणारी' गोष्ट!

Updated: Nov 28, 2015, 04:26 PM IST
एका लग्नाची 'डोळ्यात पाणी आणणारी' गोष्ट! title=

शिकागो : एका जीवघेण्या आजारासोबत संघर्ष करणाऱ्या ४९ वर्षीय जुबल कर्बी हा अमेरिकेत राहणारा व्यक्ती आयसीयूमध्ये राहून चक्क दोन लग्नांमध्ये सहभागी झालाय... हे लग्न होतं त्याच्या मुलीचं आणि दुसरं त्याचं स्वत:चं...

तीन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्बी यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्यानं २५ वर्षांपासून 'लिव्ह इन पार्टनर' असणाऱ्या कॉलीनसोबत लग्न करण्याचा कर्बी यांनी निर्णय घेतला. कर्बी यांची मुलगी काईला हिचंदेखील सात महिन्यांपूर्वी लग्न ठरलं होतं आणि १६ जुलै २०१६ ला तिचं लग्न होणार होतं पण कर्बी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांनी त्याच दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रुग्णालयातील कमचाऱ्यांनीही लग्नाची तयारी सुरू केली. रुग्णालयातील एक कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तो एक क्लिनीकल केअर मॅनेजर आहे पण त्यानं आज एका वेंडिग कॉर्डिनेटरचं काम बजावलं. तिने लग्नासाठी केक, फुले आणि संगिताचं आयोजन केलं.

आयसीयूमध्ये पार पडलेल्या या अनोख्या लग्नामध्ये रुग्णालयाचे कर्मचारी, कर्मचाऱ्यांचे काही नातेवाईक आणि पत्रकार सहभागी झाले होते. या लग्नात अनेकांना आपले अश्रु आवरणं कठिण झालं. लग्नानंतर कार्बी यांनी वेंटिलेटर मास्क काढून त्यांच्या मुलीच्या गालावर किस केलं आणि बेडवर हात मारून टाळीही वाजवली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.