बीजिंग : चीनमध्ये २१ फुटबॉल मैदानांएवढे रेल्वे स्थानक उभारण्यात आलं आहे, चीनमधील शेन्झेन शहरात तब्बल २१ फुटबॉल मैदानांएवढे मोठे स्थानक तयार करण्यात आले आहे.
या स्थानकामुळे शेन्झेनमधील रहिवासी अवघ्या १५ मिनिटांत हाँगकाँग गाठू शकतात. ३० डिसेंबरपासून हे स्थानक सुरू होणार आहे, पुढील टप्प्यात आणखी ट्रेन सुरू करण्यात येणार आहे,
१.४७ लाख चौरस मीटर परिसरात हे स्थानक पसरले आहे. या तीन मजली स्थानकात १ हजार २०० आसने असून, तिथे एका वेळी सुमारे ३ हजार प्रवासी ट्रेनची प्रतीक्षा करू शकतील, अशी माहिती गाँगझो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
फ्युटेन हायस्पीड रेल्वे स्टेशन या आशियातील सर्वांत मोठ्या भूमिगत रेल्वे स्थानकाचे उद्घाटन बुधवारी होणार आहे. या स्थानकामुळे गाँगझो आणि हाँगकाँग प्रवासाच्या वेळात तब्बल अर्धा ते एक तासाची घट होणार आहे.