ऑस्ट्रेलियाच्या विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला

ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरातून उड्डाण घेतलेल्या व्हर्जिन एअरलाइन्सच्या एका विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न विमानातील कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला. या विमानाला इंडोनेशियाच्या बाली शहरात उतरविण्यात आल्यानंतर त्या प्रवाशाला ताब्यात घेण्यता आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 25, 2014, 07:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बाली
ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरातून उड्डाण घेतलेल्या व्हर्जिन एअरलाइन्सच्या एका विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न विमानातील कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला. या विमानाला इंडोनेशियाच्या बाली शहरात उतरविण्यात आल्यानंतर त्या प्रवाशाला ताब्यात घेण्यता आले आहे.
व्हिर्जिन कंपनीचे बोइंग ७३७ हे विमान ब्रिस्बेनहून इंडोनेशियाला जात होते. पोलिसांनी इंडोनेशियन टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार प्रवासी कॉकपीटमध्ये घुसरण्याचा प्रयत्न करीत होता. पण त्याला अटक करण्यात आली आहे.
इंडोनेशियन एअर फोर्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार लष्कराने विमानाचा ताबा घेतला आहे. प्रवासी दारूच्या नशेत होता आणि तो विमान अपहरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व्हर्जिन एअर लाइनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.