वॉशिंग्टन : ज्या प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूडचा काहीही अंदाज लावता येत नाही. ते कधी कोणती गोष्ट करतील याची कोणालाच काही कल्पना नसते. अशीच एक घटना घडली आहे जगातील सर्वात ताकदवान देशाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या बाबतीत.
हनोईमध्ये ओबामांनी अँथनी बौर्डन यांना सोबत घेतलं आणि हनोईच्या रस्त्यावर फिरण्यासाठी निघाले. अचानक त्यांच्या गांड्याचा ताफा अचानक एका गल्लीतील छोट्याश्या हॉटेलजवळ थांबला आणि गाडीतून राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उतरले.
ओबामांसोबत असलेले स्पेशल सर्विसेस एजेंट्स आणि सुरक्षा रक्षकांना देखील काही कळत नव्हतं. ओबामा अचानक त्या साध्या हॉटेलमध्ये गेले आणि तेथे जेवन ऑर्डर केलं. सुरक्षा रक्षकांनी तेवढ्या वेळेपुरता रस्ता दोन्ही बाजूंनी आपल्या ताब्यात घेतला. पण ओबामांना याची कोणतीही कल्पना नव्हती ते तर हॉटेलमध्ये मस्त सूपचा आस्वाद घेत होते. डिनर केल्यानंतर त्यांनी झालेलं ६ डॉलरचं बिलही दिलं.
पाहा व्हिडिओ