शतकातील सर्वात मोठ्या हिमवादळाने महासत्ता झाली ठप्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचा नैऋत्य भागाचे कामकाज सध्या पूर्णपणे ठप्प झालंय.

Updated: Jan 23, 2016, 01:49 PM IST
शतकातील सर्वात मोठ्या हिमवादळाने महासत्ता झाली ठप्प title=
वॉशिंग्टन : अमेरिकेचा नैऋत्य भागाचे कामकाज सध्या पूर्णपणे ठप्प झालंय. त्याचं कारणही तसंच आहे. तिथे या शतकातील सर्वात मोठ्या हिमवादळाचा फटका बसलाय. यापूर्वी १९२२ साली इतकं भयानक वादळ अमेरिकेत आलं होतं.  
 
अमेरिकेतील न्यूयॉर्क, राजधानी वॉशिंग्टन यांसारखी अनेक महत्त्वाची शहरं सध्या पूर्णपणे ठप्प झालीयेत. काही ठिकीणी वीजपुरवठाही खंडित झालाय.
 
 
जवळपास दोन ते तीन फूट बर्फाचा थर सध्या तिथल्या रस्त्यांवर आहे. मेट्रो रेल्वे सारख्या महत्त्वाच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी जवळपास ७६०० विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. शाळा, कॉलेजांनाही सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.



अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुद्धा या वादळासमोर हतबल झालेत. शनिवारपर्यंत ते व्हाईट हाऊसच्या बाहेर पडणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे.


अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील काही राज्यांत आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. यात आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून सरकारने नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.