एका तासात गिळल्या वियाग्राच्या ३५ गोळ्या, झाले हे हाल...

ब्रिटनच्या इस्ट यॉर्कशायरमध्ये विचित्र प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने एका तासात वियाग्राच्या ३५ गोळ्या खाल्या. सेक्स वर्धन या गोळ्या खाल्याने त्या गुप्तांगात सुमारे पाच दिवस तणाव होता. इतके नाही त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. 

Updated: Sep 22, 2015, 07:52 PM IST
एका तासात गिळल्या वियाग्राच्या ३५ गोळ्या, झाले हे हाल... title=

लंडन  : ब्रिटनच्या इस्ट यॉर्कशायरमध्ये विचित्र प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने एका तासात वियाग्राच्या ३५ गोळ्या खाल्या. सेक्स वर्धन या गोळ्या खाल्याने त्या गुप्तांगात सुमारे पाच दिवस तणाव होता. इतके नाही त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. 

या प्रकारामुळे डॉक्टरांनी त्या व्यक्तीला खूप झापले. वेबसाईट मिररने दिलेल्या बातमीनुसार डेनियल मेडफोर्थ याने मस्करीत दारू प्यायल्यानंतर सेक्सवर्धक वियाग्राच्या ३५ गोळ्या खाल्या. 

३६ वर्षीय डॅनियलने सांगितले की, गोळ्या खाल्यानंतर मला चक्कर आले आणि मी आजारी पडल्यासारखे वाटले. मला सर्व गोष्टी हिरव्या दिसत होत्या. माझ्या गुप्तांगात अत्यंत तणाव निर्माण झाला आणि हा तणाव जात नव्हता. 

द सन ने दिलेल्या बातमीनुसार दोन मुलांचा बाप असलेल्या या व्यक्तीने आपल्या या कृत्याचे पत्नीला फोनवरून सांगितले. पत्नीने अॅम्ब्युलन्स बोलावली त्यानंतर डॅनियलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला नर्स आणि डॉक्टरांनी खूप रागावले. 

त्याला सामान्य होण्यासाठी अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागले. डॅनियलने माफ केल्याबद्दल आणि काळजी घेतल्याबद्दल आपल्या पत्नीचे आभार मानले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.