www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानची संसद बरखास्त करण्याच्या मागणीसाठी हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.
पाकिस्तानमधले धर्मगुरू ताहीर उल कादरी यांनी संसद बरखास्त करण्यासाठी आजपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, सरकारनं कादरींच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं हजारो समर्थकांसह कादरी आज रस्त्यावर उतरले. इस्लामाबादमध्ये संसदेच्या समोर कादरींच्या नेतृत्वात जोरदार निदर्शनं करण्यात आली. कादरींना अटक करण्यासाठी पोलीस पुढे सरसावताच जमावानं पोलिसांवर जोरदार दगडफेक केली.
पोलिसांनीही अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कादरी आपल्या कारनं निसटून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी थेट त्यांच्या कारवरच गोळीबार केला. मात्र कादरी समर्थकांनी आक्रमक होत पोलिसांच्या कारवाई अडथळा आणला. त्यामुळं कादरींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आलं. कादरी समर्थक आपल्या मागणीवर ठाम असून संसदेसमोर ठाण मांडून बसले आहेत.