कॅनबरा : आयुष्य आणि नियती किती भयानक खेळ खेळू शकते, याचंच हे उदाहरण... गेल्या सात वर्षांपासून आई बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तिचं स्वप्न तर पूर्ण झालं... पण, त्या दिवशी तिच्या पतीवर अंत्यसंस्कार होत होते...
‘वेबसाईट डेली मेल डॉट को डॉट यूके’नं दिलेल्या बातमीनुसार, ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या क्रिस्टी किर्टनर हिचा एक व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर सध्या व्हायरल होतोय... या व्हिडिओमध्ये क्रिस्टी आपली दुर्दैवी कहाणी शेअर करतेय. तिची ही कहानी ऐकून लोक तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करताना दिसतायत.
क्रिस्टीच्या पतीचं रोयस क्रिचनर (३५ वर्ष) याचा मृत्यू ८ ऑक्टोबर रोजी एका कार अपघातात झाला. रोयसची गाडी एका झाडावर आदळली आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळी रोयसचा हा अपघात झाला तेव्हा तो आपल्या सेंट्रल क्विन्सलँड स्थित घरापासून केवळ १० मिनिटांच्या अंतरावर होता.
यू-टयूबवर क्रिस्टी म्हणतेय, ‘मी गर्भवती आहे पण मी माझं दु:ख करू सांगून...’ क्रिस्टीनं आपली आई बनण्याची पूर्ण कहाणीच यू-ट्यूब आणि सोशल मीडियावर शेअर केलीय. या कहाणीतून तीचं दु:ख, पीडा आणि भीती दिसून येतेय. क्रिस्टीचा हा संपूर्ण व्हिडिओ तिच्या यूट्यूब अकाऊंट ‘ConceiveABaby' वर पाहता-ऐकता येईल.
क्रिस्टी आणि रोयस गेल्या दहा वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते... त्यांच्या घरात लवकरच एखाद्या चिमुकल्याचा आवाज घर गजबजून टाकेल यासाठी दोघेही प्रयत्नशील होते. पण, ज्या दिवशी क्रिस्टीला ती गर्भवती असल्याचं समजलं तेव्हा रोयसनं मात्र तिचा हात सोडून या जगाचा निरोप घेतला होता.
आणखी एक विडंबना म्हणजे, रोयस याच्या मृत्यूपूर्वी ठीक दोन आठवड्यांपूर्वी, या जोडप्यानं आपला जीवन विमा रद्द केला होता. क्रिस्टीचं पुढचं आयुष्य सुरळीत जावं, यासाठी तिचे मित्र फंड जमा करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.