'२०१८ पर्यंत आई होऊ नका !'

या लॅटिन अमेरिकी देशातील सरकारने देशातील महिलांना अजब सल्ला दिल्ला आहे. नवजात बालकांमध्ये पसरत जाणाऱ्या 'जीका' नावाचा विषाणू हा देशात गंभीर विषय बनल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील दोन वर्षांसाठी गर्भधारण न करण्याचा सल्ला महिलांना देण्यात आला आहे.

Updated: Jan 26, 2016, 10:07 PM IST
'२०१८ पर्यंत आई होऊ नका !' title=

अल सल्वाडोर : या लॅटिन अमेरिकी देशातील सरकारने देशातील महिलांना अजब सल्ला दिल्ला आहे. नवजात बालकांमध्ये पसरत जाणाऱ्या 'जीका' नावाचा विषाणू हा देशात गंभीर विषय बनल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील दोन वर्षांसाठी गर्भधारण न करण्याचा सल्ला महिलांना देण्यात आला आहे.

देशात जीका विषाणूंचे वहन मोठ्या प्रमाणात होत आहे. हा विषाणूंचा परिणाम नवजात बालकांच्या डोक्यावर होतो. त्यामुळे सल्वाडोर सरकारने देशातील महिलांना २०१८ पर्यंत गर्भधारण न करण्याचा सल्ला दिला आहे. यावरून आता सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे.

जीका विषाणूमुळे लॅटीन अमेरिकन आणि कैबेरियन देश चांगलेच संकटात सापडलेत. ब्राझिलमध्ये देखील १० लाख लोकांना या आजाराची लागण झाली आहे. या भागात विकृत डोकं असलेली ४ हजार बालकं जन्माला आली आहेत.