एकत्र दारू पिणारी जोडपी अधिक आनंदी!

सुखी संसाराचा नवा मंत्र... पती-पत्नींनो सोबत दारू प्या आणि खूश राहा ! एकत्र दारू पिणारी जोडपी इतरांपेक्षा अधिक खूश... न्यूझीलंड विद्यापीठाच्या सर्व्हेतील नवे सत्य

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 19, 2013, 05:26 PM IST

www.24taas.com,
संसार म्हटला की भांड्याला भांडं लागणारच... पण आता आम्ही सांगतो सुखी जीवनाचा नवा फंडा... ग्लासाला ग्लास भिडवणारा... नवरा-बायकोचा संसार सुखाचा करायचा असेल तर आठवड्यातून किमान एकदा एकत्र बारमध्ये जा... दारू प्या... एकत्र मदिरापान करणारी जोडपी इतर जोडप्यांपेक्षा ४ टक्के अधिक सुखी असतात. न्यूझीलंडच्या विद्यापीठाने केलेल्या सर्व्हेतून जगासमोर आलंय....
सुखी संसाराचा नवा मंत्र...
पती-पत्नींनो सोबत दारू प्या आणि खूश राहा !
एकत्र दारू पिणारी जोडपी इतरांपेक्षा अधिक खूश
न्यूझीलंड विद्यापीठाच्या सर्व्हेतील नवे सत्य
दारू प्या आणि खूश राहा... एका टेबलवर बसून जाम से जाम भिडवणारे पती-पत्नी सर्वाधिक खूश असतात... एकमेकांसोबत दारूचे ग्लास रिचवणारे पती-पत्नी इतर जोडप्यांपेक्षा अधिक खूश असतात. दारू पिणारे कुटुंब टेंशन मुक्त असतं आणि त्यांच्यातील संबंधही सुमधूर होतात. न्यूझीलंडच्या ओटेगो विद्यापीठाने केलेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आलीय.
विद्यापीठाने केलेल्या सर्व्हेनुसार आठवड्यातून एकदा पतीसोबत दारू पिणारी पत्नी, दारू न पिणा-या इतर बायकांपेक्षा 4 पट अधिक आनंदी असते. आठवड्यातून एकदा पत्नीसोबत दारू पिणारे पती इतर पतींपेक्षा तीनपट अधिक खूश असतात.1500 पेक्षा अधिक जोडप्यांचं सर्व्हेक्षण करण्यात आलं, यापैकी 91 टक्के जोडप्यांनी आठवडयातून एकदा सोबत दारू पिल्याने संपूर्ण आठवडा आनंदात जात असल्याचं सांगितलंय. 1500 जोडप्यांपैकी 88 टक्के जोडप्यांनी महिन्यातून एकदा किंवा तीनदा सोबत दारू पिल्याचं समोर आलंय.
पण याचा अर्थ रोजच पती-पत्नीने दारूचे ग्लास घेऊन बसावेत, असा नाही... पती किंवा पत्नीने प्रमाणापेक्षा जास्त दारू पिल्यानं त्याचा उलटा परिणामही होऊ शकतो... त्यामुळे संबंध सुधारण्यापेक्षा ते बिघडूही शकतात, असा सावधानतेचा इशाराही या सर्व्हेतून देण्यात आलाय. त्यामुळे `काठोकाठ भरू द्या पेला...` हे ठीक आहे. पण दारूचे पेग रिचवताना थोडी सावधगिरीही बाळगा...!

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.