www.24taas.com, झी मीडिया, मुल्तान/पाकिस्तान
सोनं, खजिना, धन याची लालसा माणसाकडून काय करवते याची अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. असाच काहीसा प्रकार घडला पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातील मुल्तान जिल्हात...
मुल्तान जिल्ह्यातल्या दिल्ली गेट इथं जीशान कुरेशी (22) या तरुणानं सोन्याचा शोध घेण्यासाठी आपल्याच घरात 30 फूट विहीर खोदली. मात्र या विहीरीत तोच दफन झाला आणि त्याचा मृत्यू झाला. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी एका शिख कुटुंबानं घरात सोनं लपवलं असल्याचं एका ज्योतिषीनं जीशान आणि त्याच्या वडिलांना मोहम्मद मुस्तफाला सांगितलं. त्यानंतर चार वर्षांपासून हे मुलगा-वडील आपल्या घरात सोन्याचा शोध घेण्यासाठी खोदकाम करू लागले.
गेल्यावर्षी 15 फूट विहीर खोदली तरी सोनं हाती लागलं नाही म्हणून ते दोघं पुन्हा ज्योतिषाकडे गेले. तर त्यानं 30 फूट खोदायला सांगितलं. त्यामुळं अतिशय गरीब असलेलं हे कुटुंब, त्यांना सांभाळणारा जीशान तीन महिन्यांपासून दिवसरात्र खोदकाम करत होता. नुकतंच त्यानं 30 फूट खोदकाम सुरूही केलं होतं. मात्र शनिवारी जीशान विहीरीत उतरला आणि परत आलाच नाही. त्यामुळं मग मुस्तफानं पोलिसांना बोलावलं.
पोलिसांनी तब्बल 36 तास शोध घेतल्यानंतर जीशाचा मृतदेह सापडला. जीशान आपल्या दोन खोल्यांच्या घरात आई-वडील आणि दोन लहान बहिणींसोबत राहत होता. आता या प्रकरणी पोलिसांनी जीशानचे वडील मुस्तफा आणि त्याच्या पत्नीला अटक केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.