कॅलोस : जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमानानं इंग्लिश खाडी पार करून यशाचा एक नवीन टप्पा गाठलाय.
फ्रान्समधील कॅलोसपासून इंग्लंडच्या शॉरलाईनपर्यंतचे अंतर पार करून या विमानाने नवीन इतिहास रचलाय. फ्रेंच वैमानिक ह्युजेस डुवल यांनी ५२ किलोमीटरचे अंतर एका तासात पार केलंय. इलेक्ट्रिक विमानाच्या सहाय्यानं केलेलं हे उड्डाण यशस्वी झाल्याने डुवल यांनाही फार आनंद झालाय.
हे इलेक्ट्रॉनिक विमान सुमारे १०० किलो वजनाचे असून त्यात फक्त एकच व्यक्ती बसण्याची व्यवस्था आहे. विजेवर चालणाऱ्या या विमानाला दोन इंजिन्स आहेत.
‘ई-फॅन इलेक्ट्रिक’ असे या विमानाचे नाव असून ‘एअरबस’ या विमान बनवण्याऱ्या कंपनीनं त्याची निर्मिती केलीय. २०१७ पर्यंत हे विमान बाजारात आणण्याचा कंपनीचा मानस आहे. हे ध्येय गाठण्यासाठी २०१४ पासूनच विमानाच्या विविध चाचण्या सुरू आहेत.
इलेक्ट्रिक विमानाचा सगळ्यात मुख्य फायदा म्हणजे यातून कार्बन उत्सर्जन होत नाही. येत्या १५ वर्षात हायब्रिड इलेक्ट्रिक इंधनावर चालणारे १०० आसनी विमान बनवण्याचा आमचा विचार आहे व हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे, अशी आशा 'एअरबस' कंपनीचे अधिकारी जीन बोट्टी यांनी व्यक्त केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.