www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून नवाज शरीफ यांनी आज पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ते तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.
पीएमएलएन प्रमुख नवाज शरीफ यांनी कौमी असेंबलीमध्ये शपथ घेतली. पाकिस्तान संसदेत ३४२ संख्याबळ आहे. शरीफ यांना सर्वांनी साथ दिल्याने २४४ जागा मिळाल्यात तर मतविभाजनामुळे पाकिस्तान पिपल्स पार्टीचे उम्मेदवार मखदुम अमीन फहीम यांना ४२ ठिकाणी विजय मिळाला. तर माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना ३१ जागा मिळाल्यात.
शरीफ यांच्यावर देशद्रोहाचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप करून पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी देश सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर ते देशाबाहेर होते. त्यांना पाकिस्तानात येण्याची परवानगी देण्यात आल्याने ते कित्येक वर्षांच्या विजनवनवासातून मायदेशी परतले. त्यानंतर त्यांच्या पक्षाने निवडणूक लढविली आणि बाजी मारली.
दरम्यान, पाकिस्तानात करण्यात येणारे ड्रोन हल्ले अमेरिकेने थांबवावेत, अशी मागणी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केली आहे.
तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर शरीफ यांनी केलेल्या पहिल्याच भाषणात ही मागणी केली आहे. वायव्य पाकिस्तानच्या आदिवासी भागात अमेरिकेची ड्रोन हल्ल्यांची मोहीम सुरू आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीतील एकूण सदस्यांची संख्या ३४२ असते. त्यातील २७२ सदस्य प्रत्यक्ष निवडणूक लढवून सभागृहात येतात. महिला आणि बिगर मुस्लिम सदस्यांसाठी सभागृहातील ७० जागा आरक्षित ठेवल्या जातात. निवडणुकीतील राजकीय पक्षांच्या कामगिरीनुसार त्यांना आरक्षित जागांचे वाटप केले जाते. त्यानंतर राजकीय पक्ष आरक्षित जागांवर सदस्यांची नेमणूक करतात. या सर्व सदस्यांनी मिळून होणाऱ्या ३४२ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी १७२ जागांची गरज असते.
पाकिस्तान संसद पक्षीय बलाबल
जाहीर निकाल २५०
पीएमएल-एन - १२२
पीपीपी - ३१
पीटीआय - २६
एमक्यूएम - १६
जेयूई - १०
इतर पक्ष - २०
अपक्ष - २५
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.