सिंगापूर : सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कून यू याचं वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झालं. ली कून यू यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
सिंगापूरच्या आधुनिकीकरणाचे जनक म्हणून ओळखले जातात. यू हे राजकारणातील अजातशत्रू नेते म्हणून ओळखले जात होते.
सुमारे तीन दशके सिंगापूरचे पंतप्रधान राहिलेल्या ली यांनी प्रशासन आणि आर्थिकदृष्ट्या सिंगापूरची खूप प्रगती केली. ली कुआन यू यांचे पुत्र ली सिएन लुंग सध्या सिंगापूरचे पंतप्रधान आहेत.
न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात
लू कून यू हे गेल्या महिन्यापासून न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात होते. अखेर आज सकाळी त्यांचे निधन झाले. ली यांना २१ फेब्रुवारीपासून कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू होता. श्वसनविकारामुळे यू यांना ५ फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.