नवी दिल्ली : अमेरिकेच्या ओहायोमध्ये एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला एका दुसऱ्या तरुणीवर बलात्कार करण्यास सांगितलं आणि त्याचं थेट लाईव्ह प्रसारण सोशल मीडियावर केलं.
फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती. त्यानंतर ही गोष्ट आता समोर आली. या विरोधात पीडित तरुणीने दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मरिना या तरुणीने असं का केलं याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
मरिना लोनिना या १८ वर्षीय तरुणीने पीडित तरुणीला तिच्या घरी बोलवलं जेथे तिचा बॉयफ्रेंड अगोदरपासूनच उपस्थित होता. मरिना आणि तिचा बॉयफ्रेंड गेट्स यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अपहरण आणि अन्य काही कलमांतर्गत दोषी ठरवलं आहे. यामध्ये त्यांना जवळपास ४० वर्षाची शिक्षा होऊ शकते.