जपानची रेल्वे धावली ६०३ किमी प्रति तास

जगात सर्वात वेगवान रेल्वे जपानने तयार केली आहे. ही सात डब्यांची रेल्वे तासाला ६०३ किलोमीटर वेगाने धावली. माऊंट फुजीजवळ आज ही चाचणी घेण्यात आली. या रेल्वेला मॅगलेव्ह रेल्वे असं म्हणतात.

Updated: Apr 21, 2015, 06:59 PM IST
 जपानची रेल्वे धावली ६०३ किमी प्रति तास title=

टोकियो : जगात सर्वात वेगवान रेल्वे जपानने तयार केली आहे. ही सात डब्यांची रेल्वे तासाला ६०३ किलोमीटर वेगाने धावली. माऊंट फुजीजवळ आज ही चाचणी घेण्यात आली. या रेल्वेला मॅगलेव्ह रेल्वे असं म्हणतात.

अशी वेगवान ट्रेन भारतात धावली तर मुंबई-पुणे प्रवास केवळ १५ मिनिटात आणि मुंबई-नागपूर प्रवास केवळ दीड तासांत पूर्ण होऊ शकेल. 

एका आठवड्यापूर्वीच ५९० किलोमीटर प्रतितास हा विक्रम करण्यात आला होता. तर त्यापूर्वी २००३ साली ५८१ किलोमीटर प्रतितास एवढी गती गाठण्यात आली होती. 

मॅगलेव्ह रेल्वे म्हणजे काय? 
मॅगलेव्ह ही एक वाहतूकीची प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये चुंबकीय शक्तीचा उपयोग करण्यात येतो. रेल्वेमध्ये या प्रणालीचा प्रामुख्याने वापर केला जातो. 

उच्च वेगामध्येही शांत आणि हळूवारपणे पुढे जाण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. प्रचंड गती घेतानाच समोरून येणाऱ्या वाऱ्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी या प्रणालीतील अधिक ऊर्जा खर्च होत असते.

पाहा व्हिडिओ - 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.