पॅरिस : फ्रान्समधील पॅरिस दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंट अब्दुलहामेद अबाउदच्या मृत्यूच्या बातमीला फ्रान्सनं दुजोरा दिला आहे. यासोबतच पोलीस कारवाई दरम्यान, आत्मघातकी हल्ला करत स्वतःला उडवून देणाऱ्या महिला दहशतवादीचा फोटोही जारी करण्यात आलाय. हस्ना एतबुलाचेन नावाची ही दहशतवादी अबाऊदची बहीण होती.
दरम्यान, फ्रान्सवर आता रासायनिक किंवा जैविक शस्त्र हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. इसिसचे दहशतवादी हा हल्ला घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युएल वॉल्स यांनी म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्यांनंतर फ्रान्समध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी आणखी तीन महिन्यांसाठी वाढविण्यात आली आहे. फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युएल वॉल्स यांनी इसिसच्या रासायनिक आणि जैविक हल्ल्याचा धोका लक्षात आणून दिल्यानंतर संसदेत आणीबाणी वाढवण्याला मंजुरी देण्यात आली.
इसिसने अपहरण केलेल्या चीन आणि नार्वेच्या नागरिकाची हत्या केलीय. चीनचा फान जिंघुई आणि नार्वेता ओले जॉहन ग्रिम्सगार्ड ओफस्टाड अशी त्यांची नावं आहेत. ही घटना अमानवीय असून यावर चीननं संताप व्यक्त केलाय. आता चीननंही इसिसविरोधात आवाज बुलंद केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.